महाराष्ट्र शासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक
आयोजित
सर्व खेळाडू आणि युवकांसाठी जिह्वा क्रीडा सप्ताह अंतर्गत एक विशेष सायबर साक्षरतेवरती व्याख्यान आणि लाईव्ह डेमो आयोजित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम खेळाडूंमध्ये सायबर सुरक्षा आणि डिजिटल साक्षरतेची जाणीव निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. सायबर फॉरेन्सिक तज्ञ तन्मय स. दीक्षित या विषयावर सखोल माहिती आणि सायबर गुन्हेगारीविरुद्ध कशा प्रकारे दक्ष राहावे याबाबत मार्गदर्शन करतील.
या कार्यक्रमादरम्यान खालील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाईल :
हा कार्यक्रम २५, २६, २७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत होणार आहे.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कृपया खालील माहिती भरावी आणि व्हिडिओवरील "रिमाइंडर" बटन प्रेस करून सहभाग नोंदवावा.
या कार्यक्रमादरम्यान खालील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाईल :
- सोशल मीडिया ऍप्स आणि साईट्ससाठी सुरक्षा प्रणाली: खेळाडूंनी सोशल मीडिया वापरताना आपल्या वैयक्तिक माहितीची सुरक्षा कशाप्रकारे करावी, कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे आणि सुरक्षा तंत्रे कशा प्रकारे वापरावी, याबद्दल मार्गदर्शन.
- ऑनलाइन आर्थिक व्यवहारांसाठी सुरक्षा: क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरताना ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी सखोल माहिती.
- ऑनलाइन ब्रँडिंग: खेळाडूंनी त्यांच्या क्रीडा कारकिर्दीचा प्रभाव वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा कसा प्रभावी वापर करावा, स्वतःचे ब्रँडिंग कसे करावे याबद्दल तज्ञांचे मार्गदर्शन.
हा कार्यक्रम २५, २६, २७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत होणार आहे.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कृपया खालील माहिती भरावी आणि व्हिडिओवरील "रिमाइंडर" बटन प्रेस करून सहभाग नोंदवावा.