आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षा प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. डेटा चोरी, ऑनलाइन फसवणूक, आणि सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी सज्ज राहणे गरजेचे आहे. याच उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि सायबर संस्कार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ५ दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे मुख्य वैशिष्ट्ये : थेट संवाद : सहभागींना तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल. लाईव्ह सत्रांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक आपले प्रश्न विचारून मार्गदर्शन घेऊ शकतात. ई-सर्टिफिकेट : कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि NSS वॉलंटियर्सना ई-सर्टिफिकेट प्रदान केले जाईल. मोफत प्रवेश : ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी पूर्णतः मोफत आहे. उद्दिष्टे : सायबर सुरक्षा क्षेत्रातील मूलभूत ज्ञान विकसित करणे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्यास प्रवृत्त करणे. सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण व देशाच्या सुरक्षेत योगदान देण्यासाठी सक्षम बनवणे. कार्यशाळेत सहभागी का व्हावे ?सर्वसामान्यांसाठी आणि सायबर सुरक्षेबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरेल. तुमच्या ऑनलाइन सुरक्षिततेला बळकट करण्यासाठी, करिअरच्या दृष्टीने नवनवीन संधी शोधण्यासाठी, आणि सायबर गुन्ह्यांपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी ही कार्यशाळा एक महत्त्वाची पायरी ठरू शकते. कार्यशाळेत शिकता येणारे विषय :
मारोतराव वादाफळे शेतकी महाविद्यालय | यवतमाळ केवळरामजी हार्डे कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर, चमोरशी, जिल्हा-गडचिरोली
|