मोबाईल वापरताना दक्षता घ्या - तन्मय दिक्षीत मोबाईल अथवा समाजमाध्यमांचा उपयोग करताना आपली वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तिकडे जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सायबर तज्ज्ञ तन्मय दिक्षीत यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालयातर्फे क्रांतिवीर वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित लोकराज्य वाचक मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक संपत चाटे, प्राचार्य शांताराम बडगुजर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे आणि प्रा.शरद काकड उपस्थित होते. श्री.दिक्षीत यांनी मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास घ्यावयाची खबरदारी, इंटरनेट सुरक्षा, वैयक्तिक माहितीची सुरक्षा आदींविषयी माहिती दिली. समाजमाध्यमांचा सकारात्मक कामासाठी उपयोग करा, असेही त्यांनी सांगितले. Source : http://dgiprnashik.blogspot.com/2018/09/blog-post_20.html
|