तन्मय दीक्षित, सायबर एक्सपर्ट येत्या पंचवीस वर्षांच्या काळात सायबर क्षेत्रात कसे व कोणते बदल घडून येऊ शकतात? फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? याबाबत चर्चा करणे आजच्या आधुनिक काळात आवश्यक झाले आहे. आपण कोणतीही उपकरणे वापरात असाल तर आपल्याला बरेच काळजीपूर्वक राहणे आवश्यक आहे. आपण आपले घर जसे सुरक्षित राहण्यासाठी काळजी घेतो तशीच सायबर सुरक्षा तपासणेही आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने सार्या जगात नवी क्रांती आणली आहे. जगाच्या कोणत्याही कोपर्यातून व कुठेही सर्व प्रकारची माहिती आता काही क्षणात पोहोचवता येते. लाईव्ह कम्युनिकेशनही करू शकतो. तंत्रज्ञान हे दर क्षणाला बदलत असते. आपल्या हातातील मोबाईलचे पुढील व्हर्जन तयार झालेले असतात. येत्या पंचवीस वर्षांच्या काळात सायबर क्षेत्रात कसे व कोणते बदल घडून येऊ शकतात? फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? याबाबतचा उहापोह करणे उचित ठरेल. वाहतूक क्षेत्रात चालकांऐवजी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जाण्याची मोठी शक्यता आहे. ज्या व्यक्तीला अथवा ज्या ठिकाणी पार्सल पाठवायचे आहे त्यांचा पत्ता जीपीएसने सेव्ह केल्यानंतर वाहन अथवा ड्रोन ठराविक पत्त्यावर त्या सर्व गोष्टी सुरक्षितपणे पोहोचवतील. त्यामुळे ट्रॅकिंग करणे अजून सोपे होईल. डेटा सुरक्षित राहणे हा महत्त्वाचा भाग झाला आहे. त्यामुळे येत्या काळात डेटा सुरक्षित ठेवण्याच्या यंत्रणा अतिशय मोठ्या प्रमाणात विकसित होतील. त्यात प्रामुख्याने फोटो, ऑडिओ-व्हिडिओ तसेच डॉक्युमेंट फाईल यांच्यात विविध प्रकारचा महत्त्वाचा डेटा स्टोअर करायच्या पद्धतींचा वापर केला जाऊ शकेल. महत्त्वाचा डेटा हॅकर, क्रिमिनल्स तसेच इतर माणसांच्या हाती लागू नये म्हणून त्याची गुप्तता ठेवण्यासाठी क्रिप्टोग्राफी तसेच स्टेनोग्राफी यांचा वापर सगळीकडेच मोठ्या प्रमाणात होताना दिसेल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, त्यासोबत मशीन लर्निंग, ब्रेन कॉम्प्युटर इंटर्फेस, सोलर टेक्नॉलॉजी, विंड टेक्नॉलॉजी, वॉटर टेक्नॉलॉजी, ड्रोन टेक्नॉलॉजी, डेटा मायनिंग, बिग डेटा अॅनालिसिस, क्लाऊड टेक्नॉलॉजी यांचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा वापर करून मानव काम करत आहे. त्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून कामे झपाट्याने करण्यावर भर दिला जाईल. हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरण्यास सुरुवात झाली तर त्याचे अधिक प्रमाणात उत्पादन होऊ शकते, पण त्यामुळे बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची शक्यताही आहे. अशा वेळी उत्पादन विकणे आणि त्याचे मार्केटिंग करणे हा एक मोठा व्यवसाय बनून त्यातून पैसे कमावण्याची संधी निर्माण होईल. सध्याच्या परिस्थितीत इंटरनेटचा वापर खूप मोठ्या प्रमाणात सर्वत्र होत असल्याचे दिसून येत आहे. इंटरनेटवरून डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने सगळे जण ‘ऑनलाईन’ व्यवसाय आणि व्यवहार करू लागले आहेत, पण ते सुरक्षित न केल्याने गंडाही बसत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. त्यासोबतच डिजिटल करन्सी, बीटकॉईन, ब्रेन कॉम्पुटर इंटरफेस, ड्रोन, वायफाय, सेंसर डिव्हाईस यांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसेल. बहुतेक आई-वडील सायबर साक्षर असतीलच असे नाही. त्यामुळे ते त्यांच्या मुलांना गॅझेटस् वापरायला देतात तेव्हा त्यांच्या मुलांची अॅक्टिव्हिटी ते ट्रॅक करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची मुले सायबर जाळ्यात अडकली जातात. लहान मुलांना ‘यू-ट्यूब किडस्’ हे अॅप्लिकेशन दिले जावे. त्यामुळे लहान मुले नकळत ‘सायबर क्राईम’च्या जाळ्यात अडकणार नाहीत. व्हिडिओ, पोर्नोग्राफिकल व्हिडिओच्या जाळ्यात किंवा अतिभयानक गेम्स मुले पाहतात. एखाद्या सीरिजमध्येही त्यांना अडकवले जाते. याचा त्यांच्या बालमनावर अतिशय गंभीर परिणाम होत असल्याचेही दिसत आहे. इंटरनेट व समाज माध्यमांवर (सोशल मीडिया) आपण कोणताही फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा तो फोटो कोणत्या कॅमेर्यातून काढला गेला आहे? कोणत्या लोकेशनवरून काढला आहे? आदी तसेच इतरसुद्धा महत्त्वाची माहिती त्या फोटोतून मिळवता येते. प्रतिमा विश्लेषणात ते सहजपणे लक्षात येऊ शकते. ‘फेसबुक’वर आपला फोटो कोणी अपलोड केल्यास ‘फेसबुक’मधील कृत्रिम बुद्धिमत्तेनुसार आणि मशीन लर्निंगच्या सहाय्याने प्रतिमा विश्लेषण करून आपल्याला अधिसूचना येते. इंटरनेटवर आज चेहरे ओळखण्याचे सॉफ्टवेअर अथवा दोन चेहर्यांपासून एक तिसरा नवा चेहरा तयार करणारे अॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. Source : https://www.deshdoot.com/features/the-growing-threat-of-cyber
|