• About Us
    • Tanmay's Awards
    • My Gallery >
      • Newspaper >
        • आपलं महानगर
        • देशदूत
        • दैनिक दिव्य मराठी
        • दैनिक गांवकरी
        • लोकमत
        • पुढारी तन्मय स दीक्षित
        • सकाळ
        • Tarun Bharat
        • Lokmat Times
        • The Nashik Herald
        • दैनिक लोकनामा
      • Radio
      • Television
      • Past Events >
        • FDP STTTP
        • PPDC
        • GCEKarad
        • KVIC
        • Kopykitab
        • Chandori
        • DACOE
        • Sanjivani Boot Camp
        • Pune Vidyarthi Griha's College of Engineering, Nashik
        • Fake News
        • YCMOU
        • Government Polytechnic
    • Tanmay's Information
    • Tanmay's Initiative >
      • Purification Social Media
      • T3 Cyber Certification
    • Social Activities
    • Tanmay's Blog
  • Products
    • Secure Message ​Angel
    • The Age Identifier
    • Cyber Officers >
      • Mobile Addiction
      • E - Teachers
      • Live Streaming
  • Contact
Dr. Tanmay S Dikshit
  • About Us
    • Tanmay's Awards
    • My Gallery >
      • Newspaper >
        • आपलं महानगर
        • देशदूत
        • दैनिक दिव्य मराठी
        • दैनिक गांवकरी
        • लोकमत
        • पुढारी तन्मय स दीक्षित
        • सकाळ
        • Tarun Bharat
        • Lokmat Times
        • The Nashik Herald
        • दैनिक लोकनामा
      • Radio
      • Television
      • Past Events >
        • FDP STTTP
        • PPDC
        • GCEKarad
        • KVIC
        • Kopykitab
        • Chandori
        • DACOE
        • Sanjivani Boot Camp
        • Pune Vidyarthi Griha's College of Engineering, Nashik
        • Fake News
        • YCMOU
        • Government Polytechnic
    • Tanmay's Information
    • Tanmay's Initiative >
      • Purification Social Media
      • T3 Cyber Certification
    • Social Activities
    • Tanmay's Blog
  • Products
    • Secure Message ​Angel
    • The Age Identifier
    • Cyber Officers >
      • Mobile Addiction
      • E - Teachers
      • Live Streaming
  • Contact

जादुई एनएफटीची करामत 22 वर्षीय तरुण झाला मिलियनायर

2/2/2022

Comments

 

ऑनलाइन मार्केटिंग ने पैसे कमावणे आता नवीन राहिलेले नाही. अफिलीएट मार्केटिंग सारखे मार्ग आता पैसे कमावण्यासाठी सर्रास वापरले जात आहेत. यातून कमी वेळात खूप जास्त पैसे कमावल्याची उदाहरणेही आपण ऐकतो. आता असाच एक नवीन मार्ग सध्या गाजतो आहे. अमिताभ बच्चन, कमाल हसन, सोनू निगम, सलमान खान या बॉलीवूड सेलीब्रिटीज् ही याच्या प्रेमात आहेत. एवढेच नव्हे, तर एक 22 वर्षीय तरुण तर याच्या सहाय्याने चक्क सेल्फीझ विकून मिलियनायर झाला आहे. दचकलात ना ? हो, पण हे खरे आहे. कोणती आहे ही नवीन पद्धत ? जाणून घेऊयात.

या पद्धतीचे नाव आहे, NFT. म्हणजेच, Non Fungible Token. ही एक प्रकारची डिजिटल संपत्ति आहे. ही ‘ब्लॉकचैन तंत्रा’मार्फत चालवली जाते. यामध्ये फोटोज, व्हीडिओज, पेंटिंग्ज, व इतर किमती वस्तूंचा मालकी हक्क ठरवला जातो. आणि त्यांची खरेदी-विक्री केली जाते. ह्या सार्‍या वस्तु आजकाल डिजिटल मालमत्तेत येतात आणि त्यांची खरेदी-विक्री डिजिटल स्वरूपात करता येते. वर उल्लेख केलेला मुलगा हा कंप्यूटर सायन्सचा विद्यार्थी असून ‘इंडोनेशिया’ चा रहिवासी आहे. ‘सुल्तान गुस्ताफ अल घोझाली’ नामक ह्या मुलाने केवळ एनएफटीच्या जोरावर मिलियन डॉलर्स कमावले आहेत. त्याने एनएफटीद्वारे पाच वर्षांच्या कालावधीत त्याचे जवळपास 1000 सेल्फिझ ओपेन सी मार्केटप्लेसवर विकले आहेत. या विद्यार्थ्याने आपल्या 18 ते 20 वर्षे वयात दररोज संगणकासमोर स्टँडिंग व सिटिंग असे सेल्फिज काढले, आणि नंतर ते एनएफटीमध्ये बदलून ओपेन सीवर प्रत्येकी 222 रुपये किमतीने विकायला ठेवले. नंतर त्याचे एनएफटी कलेक्शन जवळजवळ 7 करोड पर्यंत पोहोचले. खरे तर त्याच्यासाठी ही विश्वास ठेवण्यापलीकडची गोष्ट होती की टाचे सेल्फिझ लोक इतक्या प्रमाणावर विकत घेत आहेत. त्याने ट्विटरवर लोकांना नम्र विनंती केली की त्यांनी त्याच्या फोटोजसोबत कोणतीही गैरवर्तणूक करू नये. तसे काही झाल्यास त्याचे पालक त्याच्यावर नाराज होतील. सेल्फिज विकण्यासाठी सुल्तानला इंडोंनेशीयन सेलिब्रिटीजनी सुद्धा खूप मदत केली आहे, असे मीडिया रीपोर्ट सांगतो. त्याच्या सेल्फिज पैकी काही Rs 2.22 लाखांना विकले गेले आहेत. अश्या प्रकारे आपल्या एका छोट्याश्या छंदानेया विद्यार्थ्याला कमी कालावधीत श्रीमंत आणि प्रसिद्ध बनवले आहे.

आता या एनएफटी तंत्राची सखोल माहिती पाहुयात. एनएफटी हे तंत्र पहिल्यांदा मे 2004 मध्ये, Kevin MacCoy आणि अनिल दाश यांच्याद्वारे बनवले गेले. हे नीलामी पद्धतीसारखे काम करते. कोणतीही एक एकमेवद्वितीय म्हणजेच जिची दूसरी कॉपी या जगात नाही, अशी unique गोष्ट/वस्तु एनएफटी करून लोक त्याद्वारे भरपूर पैसा कमावतात. DappRader Data नुसार, एनएफटीचा विक्रीदर 2021च्या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांमध्ये $10.7 बिलियन इतका, म्हणजेच आधीपेक्षा आठ पटीने जास्त वाढला. अत्यंत लक्षणीय प्रकारे एनएफटीचा विकास होत आहे. गेल्या काही महिन्यात ‘क्रिप्टो’ पेक्षा जास्त गूगल सर्च एनएफटीचा केला गेला आहे.

यामध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी आधी एनएफटी टोकन मिळवावे लागते. ऑनलाइन एनएफटीमध्ये आपण जेव्हा एखादे चित्र, जीआयएफ, किवा व्हिडिओ क्लिप एत्यादी वस्तु विकत घेतो, तेव्हा त्या वस्तु आपल्याला भौतिक स्वरूपात न मिळता, त्याऐवजी विशिष्ट प्रकारचे युनिक टोकन दिले जाते. हे टोकन आपल्याकडे आले की आपल्याला या डिजिटल संपत्तीची मालकी मिळते. यानंतर आपण आपल्याला हवी तशी वस्तूंची खरेदी-विक्री करू शकतो. हे टोकन आपली संपत्ती असतात, ज्याद्वारे आपण आपली डिजिटल मालमत्ता तुकड्यांसारखीही विकू किंवा खरेदी करू शकतो. जसे की, शंभरची नोट पन्नासच्या दोन नोटांमध्ये बदलली तरी मूल्य समान राहते. या प्रक्रियेमध्ये क्रिप्टोकरन्सीचा वापर होतो. यासंबंधीची सगळी पैश्यांची देवाणघेवाण क्रिप्टोकरन्सीने होते.

एनएफटीच्या मालकी हक्कासाठी ओनर सर्टिफिकेट मिळते. याने, ज्या व्यक्तिला तिच्या वस्तुचे, कलाकृतीचे, फोटो इत्यादींचे सर्व अधिकार प्राप्त होतात. यामध्ये लोक एखादी वस्तु, कलाकृती, फोटोफ्रेम, जीआयएफ, व्हिडिओ क्लिप, म्यूजिक, फिल्म, प्राचीन वस्तु, आभूषणे, आवासीय रीयल इस्टेट, वाणिज्यिक रीयल इस्टेट तसेच ‘ऑनलाइन गेमिंग’ आणि ‘क्रिप्टो आर्ट’ साठीही एनएफटी टोकन वापरतात. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून सगळ्यात जास्त कमाईचि शक्यता असते. गेमिंगचा वापर आता फक्त मनोरंजांनापुरता उरला नसून याचा उपयोग पैसे कमवण्यासाठी केला जातो आहे. गेमिंग क्षेत्रात यास खूप महत्व आहे. आपल्याकडे जर व्हर्चुअल रेस ट्रॅक असेल, तर दुसर्‍या खेळाडूला त्याच्या बदल्यात पैसे द्यावे लागतात.
  • एनएफटी कसा तयार करावा?
आपल्या जवळ काही डिजिटल सामग्री असेल, जी विकायची इच्छा आहे, तर आपण ओपेन सी व Valuable by Cent सारख्या प्लॅटफॉर्म वर जाऊ शकता. आपला स्वतःचा एनएफटी तयार करण्यासाठी, सर्वप्रथम ऑनलाइन वॉलेट क्रिएट करावे लागते, ज्यात एनएफटी होल्ड केली जाईल. क्रिप्टो असेट्सन ज्या वॉलेट मध्ये जमवला जातं, त्यास ‘प्रायव्हेट की’ ने अॅक्सेस केले जाते. ह्या की शिवाय एनएफटी ओनर टोकेन्स अॅक्सेस करू शकत नाहीत. ही संकेतशब्दासारखी काम करते. या वॉलेट ला मेटमास्क सारख्या एखाद्या सर्विसला लिंक करावे लागते. यानंतर स्वतः चा एनएफटी तयार करता येतो. यानंतर आपण खरेदी विक्री करू शकता.
 
जे ओपन सी मार्केट वरील विद्यार्थ्याने विक्रीसाठी वापरले, ते एनएफसी चे सर्वात जास्त डिमांड असणारे मार्केटप्लेस आहे. हे एनएफटीच्या ग्लोबल सेलचा मोठा हिस्सा नियंत्रित करते. नोव्हेंबर मधील आकड्यांनुसार 2020 च्या तुलनेत ओपन सी च्या विक्रिमध्ये जवळ जवळ 75,176.19 करोड एतकी वाढ झाली आहे.

एनएफटी म्हणजेच Non Fungible Tokens हे ब्लॉकचैनचा उपयोग करून बनवले जातात. आजकाल यात एथरियम ब्लॉकचैनचा उपयोग केला जातो. यात एकदा प्रवेश केला, की कोणत्याही प्रकारे डिलीट केले जाऊ शकत नाही. ब्लोकचैन तंत्रात कोणतीही गोष्ट डिजिटल बनवली जाते व त्याचा रेकॉर्ड ठेवला जातो. प्रत्येक एनएफटीचा आपला एक युनिक आयडेंटिफायर आणि मेटाडेटा असतो, ज्यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी ओळखू येते.

एनएफटीमध्ये आता Nike, आणि Adidas सारखे मोठे ब्रॅंड मेटावर्स प्रवेश करत आहेत. खेळाडूंना एनएफटी बद्दल समजावणारे एनएफटीवर आधारित गेम्स आले आहेत. जसे की, एक्सी इन्फिनिटी, Sorare, इत्यादि.

बॉलिवूड मधील मालमत्तेची एनएफटीच्या खरेदी विक्रीशी संबंधित ‘बॉलिकोईन’ ही संस्था आहे. या संस्थेचे अयान अग्निहोत्री हे सांगतात, की “बॉलीवूडसाठी एनएफटी अजून थोडी नवीन गोष्टा आहे, पण मला विश्वास आहे की बॉलीवूड स्टार्स याकडे एका नव्या प्लॅटफॉर्म च्या दृष्टीने पाहतील, जेथे ते आपल्या सामग्रीने पैसे कमवू शकतात.”  अग्निहोत्री यांनी बोलीकोईन सुरू केले व काहीच दिवसात त्यांनी उपलब्ध 2 करोड मधील 80 लाख बोलीकोईन्स विकले. क्रिकेटर दिनेश कार्तिकने एका डिजिटल आर्ट रीलच्या नीलामीची घोषणा केली आहे. याची किममत त्याने जवळ जवळ 20 हजार डॉलर एतकी ठेवली आहे. ही व्हिडिओरील त्याने मॅच जिंकवण्यासाठी शेवटच्या क्षणी काढलेल्या छक्क्याबद्दलची आहे.

भारताचे सगळ्यात मोठे फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी त्यांच्या सर्वोत्कृष्ट डिजाइन्सच्या डिजिटल स्केचेसचे एनएफटी विकले. त्याचबरोबर भारताचे लाडके अभिनेते अमिताभ बच्चनयांनी लावलेल्या निलामीने एनएफटीचे सर्व रेकोर्ड्स तोडल्याचे बोलले जाते. यावरून लक्षात येते की एनएफटीच्या लोकप्रियतेचा संसर्ग किती झपाट्याने पसरतो आहे.

भारतात क्रिप्टो एक्सचेंज वजीरएक्समध्ये एनएफटीचे काम पाहणार्‍या वाइस प्रेसिडेंट विशाखा सिंह म्हणतात, की “या क्षेत्रात दिग्गजांच्या येण्याने हालचाल अजून वाढेल. या पूर्ण सिस्टमसाठी हे खूप चांगले आहे. याने आम्हाला पूर्ण खेळ बदलून टाकणार्‍या या डिजिटल संपत्तीबद्दल लोकांमध्ये जागृती पसरवण्यास मदत मिळेल.”

 तन्मय स दीक्षित,
सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञ, नाशिक
Comments

We Would Love to Have You Visit Soon !

Copyright © 2021 Tanmay S Dikshit | All Rights Reserved Designed & Developed By Dr Tanmay S Dikshit

  • About Us
    • Tanmay's Awards
    • My Gallery >
      • Newspaper >
        • आपलं महानगर
        • देशदूत
        • दैनिक दिव्य मराठी
        • दैनिक गांवकरी
        • लोकमत
        • पुढारी तन्मय स दीक्षित
        • सकाळ
        • Tarun Bharat
        • Lokmat Times
        • The Nashik Herald
        • दैनिक लोकनामा
      • Radio
      • Television
      • Past Events >
        • FDP STTTP
        • PPDC
        • GCEKarad
        • KVIC
        • Kopykitab
        • Chandori
        • DACOE
        • Sanjivani Boot Camp
        • Pune Vidyarthi Griha's College of Engineering, Nashik
        • Fake News
        • YCMOU
        • Government Polytechnic
    • Tanmay's Information
    • Tanmay's Initiative >
      • Purification Social Media
      • T3 Cyber Certification
    • Social Activities
    • Tanmay's Blog
  • Products
    • Secure Message ​Angel
    • The Age Identifier
    • Cyber Officers >
      • Mobile Addiction
      • E - Teachers
      • Live Streaming
  • Contact